Ad will apear here
Next
मार्स मेलविन..
विशीपूर्वीच मेलविन मार्स अमेरिकेतील सर्वांत प्रसिद्ध फुटबॉलपटू बनला. भविष्याची ददात मिटेल असा करार होण्याआधीच स्वतःच्या आई-वडिलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक झाली. त्याला देहान्ताची शिक्षा बजावण्याच्या काही सेकंद आधी एकाने ते खून केल्याची कबुली दिल्याने मेलविनची सुटका झाली. त्यामागे अनेक रहस्ये दडलेली होती. डेव्हिड बॅल्डासी यांनी लिहिलेल्या ‘द लास्ट माइल’ या उत्कंठावर्धक कादंबरीचे हे कथासूत्र. सायली गोडसे यांनी केलेला या पुस्तकाच्या मराठी अनुवादातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
............
या ठिकाणी कधीही, केव्हाही तुम्हाला आडनावाने हाक मारण्यात येते आणि ऐकताच क्षणी तुम्ही तिला प्रतिसाद द्यायचा असतो.

मेलविननंसुद्धा हा शिरस्ता कधी मोडला नाही. अगदी शौचालयात असला तरीही. जणू काही तो मिलिट्रीमध्ये भरती झालेला सैनिकच होता. अर्थात तिथे तो कधीच भरती झाला नव्हता हा मुद्दा वेगळा आणि तसंही या ठिकाणीसुद्धा त्याच्या स्वत:च्या इच्छेविरुद्ध बळजबरीनेच तो आलेला होता.

‘मार्स मेलविन?’

‘येस सर, इथेच आहे मी. हा काय आलोच लगेच, सर.’ आणि लगेच न येऊन मी सांगतो कुणाला म्हणा!
आपल्याशी हे असं का वागतायत, त्याला माहिती नव्हतं आणि त्यांना ते विचारण्याची त्याच्यात हिंमतही नव्हती. कारण उत्तर काहीही असलं, तरी त्यामुळे आता काहीच फरक पडणार नव्हता. उलट प्रश्न विचारला म्हणून गार्डच्या हातातील दंडुक्याचा टाळक्यात प्रसाद मिळण्याचीच शक्यता जास्त होती.

त्यापेक्षा हंट्रसव्हिले इथल्या टेक्सास राज्य सुधारगृहामध्ये त्यानं चिंता करावी अशा बाकीच्या बऱ्याच गोष्टी होत्या. या कारागृहाच्या लाल विटांच्या भिंतीमुळे त्याला वॉल युनिट असं म्हटलं जात असे. १८४९मध्ये सुरू झालेला हा लिओन स्टार राज्यातील बहुधा सर्वांत जुना तुरुंग होता. 
आणि या ठिकाणी देहदंडाची शिक्षा देण्यासाठी खास सोय होती. मार्स नुसता इथला कैदीच नव्हता, तर गंमत म्हणजे एखाद्या विमानाप्रमाणे त्याचा कैदी क्रमांक ७ -४ -७ होता. या अनोख्या नंबरमुळेच मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या मार्सला तुरुंगातले सगळे गार्डस् ‘जंबो’ म्हणून हाक मारायचे. हे थोडंसं विसंगत होतं. कारण मार्स एखाद्या जंबोजेटसारखा बलदंड नक्कीच नव्हता. त्याची तब्येत एखाद्या खेळाडूसारखी तंदुरुस्त होती. त्याच्या सहा फूट पावणेतीन इंच एवढ्या सणसणीत उंचीमुळे बहुसंख्य लोकांना त्याच्याकडे मान वर करून बघणं भाग पडायचं.

मार्सला स्वत:ची उंची एवढी अचूक माहिती असण्याचं कारण म्हणजे ‘एनएफएल’च्या शिबिरात ती काटेकोर मोजण्यात आली होती. उंचीच काय, पण या शिबिरात त्याच्या सगळ्याच गोष्टींचं मोजमाप करण्यात आलं होतं. तपासणीच्या त्या प्रक्रियेतून जाणं मार्सला फारसं रुचलं नव्हतं. जणू काही आपण एखाद्या गुलामांच्या बाजारात विक्रीसाठी उभे आहोत आणि खरेदीदार चढाओढीनं आपल्याला ढोसून, तपासून बोली लावतायत, आपल्या विक्रेत्या मालकाशी घासाघीस करतायत असं त्याला वाटलं होतं. 

फरक इतकाच, की त्याच्या आधीच्या गुलाम पूर्वजांप्रमाणे मार्स कफल्लक अवस्थेत मरणार नव्हता. आपले खेळाडू असतानाचे दिवस संपल्यानंतरही त्याच्यापाशी पुरेसा पैसा शिल्लक होता, ज्यामुळे आपल्या शरीराची योग्य ती विल्हेवाट लावण्याची तरतूद तो नक्कीच करू शकणार होता. 

आत्ताही त्याचं वजन चांगलं दोनशे तीस पाउंड होतं; पण तो लट्ठ सुटलेला नव्हता. चांगला बळकट होता. तुरुंगात खायला दिलं जाणारं भयानक जेवण एखाद्या मोठ्या कारखान्यासारख्या भटारखान्यात शिजायचं, प्रचंड प्रमाणात चरबी आणि सोडियमचा मनमुराद समावेश असलेल्या या जेवणात काँक्रीटपासून ते कार्पेटपर्यंत काहीही बनविण्यासाठीची रसायनं मिसळलेली असण्याची शक्यता होती. 

जणू हे असलं अन्न मुद्दाम खायला घालून ते हळूहळू त्याला मारत होते आणि तरीही मार्स आपलं मूळचं अंगपिंड टिकवून होता. 

जितकी वर्षे तो या जागेपासून दूर होता, आता जवळपास तेवढाच काळ त्याला आत येऊन झाला होता. इथला काळ जणू पुढे सरकतच नसल्यासारखा भासायचा. आपण गेली वीस नाही, तर चांगली दोनशे वर्षे इथेच मुक्काम ठोकून आहोत, असं त्याला वाटत होतं; पण आता त्यानं काही फरक पडणार नव्हता. लवकरच हे सगळं संपणार होतं. आजच तो दिवस होता. 

त्याची अगदी शेवटची याचना. साफ फेटाळून लावण्यात आली होती.

तो आता संपला होता.

टेक्सास शहराच्या उत्तरेला सुमारे साठ मैलांवर असलेल्या लिव्हिंग्सटन येथील पोलनस्काय युनिटच्या वधस्तंभापासून त्याची रवानगी आता हंट्सव्हिले तुरुंगात झाली होती. आणि त्यामुळे इथल्या सगळ्यांच्या मनात एकच भावना होती की, चला! दोन दशकांची प्रतीक्षा अखेर संपली, आपल्याला हवा असलेला माणूस सापडला. आता पुन्हा एकदा तुरुंगाच्या भिंतींना मृत्युदंडाचा थरार अनुभवायला मिळणार. ही बातमी त्याला सांगायला आलेल्या त्याच्या वकिलाच्या चेहऱ्यावर अपार खिन्नता दाटून आली होती. 

ती पार हतबल झाली होती.

.....पण ती उद्या सकाळी झोपून उठणार होती.

(‘द लास्ट माइल’ ही मराठी अनुवादित कादंबरी ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZGOCH
Similar Posts
सातमाईंचे रान ‘सातमाईंचे रान’ ही आयडा बॅरेटो यांनी लिहिलेली कादंबरी बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केली आहे. खोतांचे जागृत दैवत असलेल्या सातमाई हा कादंबरीचा विषय आहे. लेखिकेला आलेल्या अद्भुत अनुभवावर आधारलेल्या या कादंबरीत विविध मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे चित्रण आले आहे. त्यातील काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत
हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला... चार जानेवारी हा कवयित्री इंदिरा संत यांचा जन्मदिन. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्हणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती
असं हे वैशिष्ट्यपूर्ण कोल्हापूर... ‘रांगडेपणाबरोबर अंगात गुरगुर आणि मस्ती असणारी, रंगेलपणा अन् शौकीनपणाबरोबर जिवाला जीव देणारी, कौतुकाबरोबरच पाय आडवा घालून पाडण्याची तयारी असलेली, लाल मातीशी घट्ट नातं असणारी आणि ‘चैनीत’, ‘निवांत’ असे शब्द खऱ्या अर्थाने जगणारी अघळपघळ मनाची माणसं म्हटलं, की ती कोल्हापूरचीच असणार. दुसरी कुठली?’ समकालीन
आनंद अंतरकर आपले वडील अनंत अंतरकर यांच्या पश्चात ‘हंस’सारख्या मासिकाच्या संपादनाची धुरा यशस्वीपणे वाहणाऱ्या आणि स्वतः उत्तम लेखन करणाऱ्या आनंद अंतरकर यांचा १८ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language